शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

मॅकॉलेपूत्रः ऋषि सुनक

लोकमत मधील लेख वाचण्यासाठी -Lokmat Times LOK_NSLK_20221031

चर्चिल यांचा आत्मा चरफडत असेल!

आधि ईस्ट इंडिया कंपनीची मालकी एका भारतीयाने मिळवली, आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरही भारतीय वंशाचा तरुण!

विजय दर्डा  31-10-2022



माझी टिप्पणी: ऋषि सुनक चा ब्रिटनचा पंतप्रधान होणे  याला मॅकॉलेच्या चिकाटीचे प्रतीक म्हणता येईल. विन्स्टन चर्चिलने दोनदा विराजमान केलेल्या सर्वोच्च स्थानासाठी ऋषि सुनकांनी सुद्धा विराजमान व्हावे ह्यात  मॅकॉलेनी पेरलेला बीज अस नक्कीच पुष्कळ  प्रमाणात लागू होत. तेव्हा विन्स्टन चर्चिल योग्य ठरले होते आणि आता आपल्याकडे ऋषी सुनक ही योग्यता धारण करीत आहेत. हे या पदासाठी

विन्स्टन चर्चिल ह्यांनी महात्मा गांधीयांना 'अर्धनग्न फकीर' अशे उल्लेखविले होते अशा हा लेखामध्ये दिलेलं आहे.   प्रश्न अस पडतं की इथे तर आपला हा सुनकला ही उपाधी किंचीत सुद्धा लागू होऊ सकते का?  त्यापेक्षा दूर ते तर भारतीय वंशाचा किंवा अधिक तंतोतंत पाकिस्तानी वंशाचा आहेत की नाही याबद्दल सुद्धा शंका येऊ शकते. वांशिक दृष्टीने तो मूळचा पाकिस्तानी आहे. लक्ष त्यांच्या धर्मावर गेलं की श्रेयासाठी भारत  तत्पर उभे! ब्रिटनमधले बरेच लोक श्री सुनक सारख्याच पाकिस्तानमध्ला ठिकाणचे आहेत परंतु ते मुसलमानी धर्मांचे असल्याने भारताला ते नकोच नको असे समझणं रास्त होत!

हा 'अर्धनग्न फकीर'  आला तरी कुठून?  असं हा विन्स्टन चर्चिल ह्यानां  मनात झालं असेल.  महात्मा गांधी ह्यांना संपूर्णपणे  मॅकॉलेचे विचारांशी निगडीत  पात्रता लागू अस्ताना सुद्धा असं का बरं घडलं?  इथे एक मात्र तरी गोष्ट सिद्ध ठरते की गांधीजीनी खालून वर पाहण्याचे चिकाटीचे प्रयत्न केला!  नेहमी लोग साहेब बनून वर्तून खाली पाहते. ज्यां लोकांच्या मध्ये मॅकॉलोंची झळ पहोचली नसेल त्यांच्यांशी संपर्क ठेवण्याचा त्यांनी ठाम प्रयत्न केला!  तृतीय श्रेणीचा प्रवास करून इतर नेतांना नकोशी वाटणारी गोष्ट त्यांनी सुद्धा करून दाखवली!

शेष भारत, श्रेष्ठ भारत ब्रिटीशांनी बनवलेला भारत अस हा अर्धनग्न फकीरांशी संलन्ग राहू इच्छित नाही. त्याचे  सर्व लक्ष अधिकाधिक सुनकांना घडण्याची तळमळ करीत आहे. आम्ही ब्रिटीशांशी नाआवड व्यक्त करीत असताना, त्यासाठी नियमीतपणे वेळ घालवत असताना सुद्धा,  खर तर,  आमच्या प्रशिक्षणात ब्रिटीशांची मेहनतीचा वाटांशी निगडीत राहण्यावाचून राहावे अशक्यप्रायच ठरते आहे.

विन्स्टन चर्चिलचा पूर्ण अवमान करणे अगदीच औचित्यपूर्ण आहे, जर आपण विचार केला तर भारताच्या उपखंडापेक्षा 18 पटीने लहान असलेल्या त्याच्या अत्यंत लहान देशाने केवळ भारतावरच नव्हे तर जवळजवळ संपूर्ण जगावर राज्य केले आहे. लेखात देलेल्याप्रमाणे, 1941 च्या जनगणनेनुसार, 1.44 लाख इंग्रजी लोक भारतात राहत होते आणि त्यांचे अधिपत्य गाजवित होते. त्याच्यासमोर आज आमचे, भारतीय वंशाचे लोक, म्हटलं तर मैकोले पुत्रे, ह्यांचे 16 लक्ष लोक  ब्रिटनच्या त्या छोट्याशा बेटावर ठाम मांडून बसले आहेत. स्वातंत्र्यपूर्व भारतीय उपखंडाचा समावेश केला तर संपूर्ण आकडा आणखी जास्त होत.  या मॅकॉलेच्या मुलांपैकी एक आज पंतप्रधान होऊ शकले, तर ब्रिटीश हे सर्व समाजाचे अभिमानाचे बिरुद असेल, हे मॅकॉले यांचेच विधान होते,  खर वाटत नसेल तर त्यांच्या काही ओळी खाली दिल्या आहेत.

ह्या उल्लट, फासा पलटायचा ठाम विचार मनात बाळगून ठेवत असेल तर, सर विन्स्टन चर्चिल सारख्यांच्या गळ्यात मराठी भाषा भरवली असती,  आमचे शैलीतले  शहरे बनवली अस्ते,  रस्ते बनवून  त्यानां त्या दूरच्या परदेशी भूमीत आपल्या सोयीची नावे देऊ शकलो असतो आणी मग तर सांगण्यात अर्थ झाला असता की – 'काळ कसा बदललाय पहा!'   ह्यावेळी तर अस म्हणता येईल की इतके वाईट काळात पूर्वीचे सामराज्याकडून, एक फलस्वरूप, आपलाच प्रशिक्षण गेतलेला हा ऋषि सुनक कामात तर आला!

लेखात पुढे लिहिलेल्या आहे की 'भारतीयांनी जगभर केवळ आर्थिकच नव्हे, तर राजकारणातही लक्षणीय टप्पा गाठला आहे. मॉरिशस, फिजी अशा देशात तर भारतीय राजकारणाच्या शीर्षस्थानी आहेत. केनडामध्येही भारतीयांचा पुष्कळच प्रभाव आहे. पोर्तुगालचे पंतप्रधान अन्तोनिओ कोस्टा हेही मूळचे भारतीय आहेत.'    या सगळ्याचा नेमका अर्थ काय होत?  शेवटी कोणाच्या नावाचा जयजयकार होतोय?  ब्रिटीश किंवा पोर्तुगीज सातासमुद्रापार करून भारतात आले नसते तर हे सर्व घडले असते का? नाही आले अस्ते तर कदाचित भारत किंवा भारतीय असण्याबद्दल या शब्दांचा इतका उल्लेखही झाला नसता!  दांभिक आदर्शवाद्यांनी जगासमोर भारत-पाकिस्तानचा आवाजही मांडला नसता.

या वर्षाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील काय सूचित करतात?  ह्यात आम्हाला नवीन काही सूचतच नाही.  खर अस आहे की इतकी वर्षे तरी आपण इंग्रजांनी दिलेली पकड सैल होऊ दिलेली नाही,  हेच त्यातून दिसून येते!  इंग्रजांनी दिलेले राज्य आपण चालवू शकलो नसतो का?  विन्स्टन चर्चिल यांना ह्याबद्दल अजिबात विश्वास नव्हता जसा की ह्या लेखात दिलं आहे.  येथे आपण अभिमानाने सांगू शकतो की सर विन्स्टन चर्चिलला आपण चुकीचे सिद्ध केले आहे. आपण इंग्रजांकडून चांगलाच धडा घेतला आहे!  आज्ञाधारक शिष्य म्हणून आपण संपूर्ण जगाला मागे टाकू शकतो.

10.45 सायं, 10-11-2022  


 मॅकॉलेचा विचार आपण ईथे मांडू या....

       2 फेब्रुवारी 1835 रोजी ब्रिटीश संसदेत लॉर्ड मॅकॉले यांचे भाषण.

            1833 मध्ये, जेव्हा कंपनीचे शासन आव्हानात्मक वाटत होते, तेव्हा मॅकॉले यांनी संसदेत विचारले होते की भारताचे भविष्य काय आहे. त्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आजच्या स्थितीला शेवटचे शब्द प्रदान करतात.

           ‘आपण त्यांना अधीन राहण्यासाठी भारतातील लोकांना अज्ञानी ठेवणार आहोत का?’ असा सवाल त्यांनी केला होता.

          'किंवा महत्त्वाकांक्षा जागृत न करता आपण त्यांना ज्ञान देऊ शकतो असे आम्हाला वाटते?

      आपल्या भारतीय साम्राज्याचे नशीब दाट अंधाराने झाकलेले आहे... कदाचित भारताचे जनमानस आपल्या व्यवस्थेच्या अंतर्गत विस्तारत असेल जोपर्यंत ती व्यवस्था उखडत नाही; चांगल्या सरकारद्वारे आम्ही विषयांना चांगल्या सरकारच्या क्षमतेमध्ये शिक्षित करू शकतो; की, युरोपियन ज्ञानात शिक्षित झाल्यानंतर, ते भविष्यातील काही काळात, युरोपियन संस्थांची मागणी करू शकतात.

       असा दिवस कधी येईल की नाही माहीत नाही. पण मी कधीही ते टाळण्याचा किंवा मागे घेण्याचा प्रयत्न करणार नाही. जेव्हा जेव्हा तो येईल तेव्हा तो इंग्रजी इतिहासातील सर्वात अभिमानाचा दिवस असेल. गुलामगिरी आणि अंधश्रद्धेच्या सर्वात खालच्या खोलीत बुडलेले महान लोक सापडणे, त्यांना नागरिकांच्या सर्व विशेषाधिकारांसाठी इच्छूक आणि सक्षम बनवण्यासारखे राज्य करणे, हे खरोखरच आपल्या सर्वांच्या गौरवाचे पदवी असेल.'

 लाल किल्ल्यावरील विद्रोह, जेम्स लीझर, 1959 कडून घेतलेल

आणखीन...

2 फेब्रुवारी, 1835 रोजी, ब्रिटिश इतिहासकार आणि राजकारणी थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले यांनी त्यांचे 'मिनिट ऑन इंडियन एज्युकेशन' दिले, ज्यामध्ये भारतीय 'मूळ' लोकांना इंग्रजी शिक्षण घेण्याची आवश्यकता स्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रसिद्ध लॉर्ड मॅकॉलेच्या मिनिटाने हा वाद अँग्लिसिस्टांच्या बाजूने निकाली काढला-मर्यादित सरकारी संसाधने केवळ पाश्चात्य विज्ञान आणि इंग्रजीतील साहित्य शिकवण्यासाठी समर्पित होती. लॉर्ड मॅकॉलेचा असा विश्वास होता की "भारतीय शिक्षण हे युरोपियन शिक्षणापेक्षा निकृष्ट आहे," जे त्यावेळच्या भौतिक आणि सामाजिक विज्ञानांच्या दृष्टीने योग्य होते. 


पूर्ण ब्लॉग वाचाः  -  मराठी अमूल्य जग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा