रविवार, १७ डिसेंबर, २०२३

तुम्ही “आई” म्हणांरा एक इंग्रज दाखवा...

 Facebook extract -

Anand Kuwar, 14th Dec 2011

तुम्ही आई म्हणांरा एक इंग्रज दाखवा...

मी तुम्हाला Mummy म्हणारे 100000 भारतीय दाखवेन...

बोलमराठी.कॉम


माझी टिप्पणी सध्याचे शिवसैनिकांनी ‘BVT’  ला ‘MCSMT’ केलं, त्यापेक्षा तेव्हाचे शिवसैनिकांनी इंग्लंड ला जाऊन तिथे LCSMT – London Chhatrapati Shivaji Maharaj Terminus उभारल असतं तर काही चोख काम झालं असं समझलं गेलं असतं. त्याच प्रमाणे तिथले लोकांच्या घशात जर मराठी लादली असती तर तिथल्या भाषेत आई चा सुद्धा प्रवेश झालं असतं.

धन्यवाद  

 To Sumit Bhagat at 13:30, 14-12-2023

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

स्वेच्छानी नालायक

 फेसबुक मध्ये माझे जे  योग दान....


माझी टिप्पणीः कुठलं स्टेडियमच्या नावाने कोण हैराण झाले आहेत?

मुघलांच्या (किंवा समझा इंग्रेजांच्या) नावांत काय न आवडणारी ध्वनी होती की लोकांना ‘सहन’ करावी लागली आहे?

सर्वकाही देवानिर्मित आहेत.  त्यात इतिहास सुद्धा जोडलेला आहे, नाही का?  इथे इतिहासाची सपशेल अवहेलना, म्हणजे की देवाची सपशेल अवहेलना होत आहे की नाही?

आमच्यात काय ते झालं आहे की इतिहासाची देणगी नाकारत बसलो आहोत?

आम्ही कस काय –स्वेच्छानी- नालायक बनलो आहोत की बॉम्बे, कलकत्ता, मद्रास, मुघल सराय, पूना, ...औरंगाबाद अणि इतर यांना मुकवावे लागले आहेत?  लोकांच्या सहज तोंडी बसलेले नांवे मुकवावे लागले आहेत? हे एक अत्यंत नकोसी वाटणारी दुर्दैवी बाब आहेत अस माझं मंतव्य आहे.

धन्यवाद. 

14.00 hrs 23-11-23



S B to my blog link on FB

दिल्लीमें अकबर रोड, शहाजहाँ रोड, तुघलक रोड, औरंगजेब रोड, गोवा वोस्को शहर, औरंगाबाद, औरंगाबाद में औरंगजेब कि कबर, अजमेर, अलिगढ़, इलाहाबाद.. रेल्वे स्टेशनपर W.H.Wheeler book stall... the list is very big...

22 hrs, (12.39 p.m., 26-11-2023)


मेरी टिप्पणीः  धन्यवाद for responding. आपने तो मुझे और भी दुःखी कर दिया.  आपका research जबरदस्त है.

वे लोग इतने साल राज न कर पाते अगर स्थानिय लोगों से सहयोग न होता. औरंगझेब का तो record है, शायद 50 सोलों के करीब राज किया था. देश का नाम आखीर में हिंदुस्तां रखा था उन्हों ने. लोग खुशी खुशी फारसी सिखते थे जैसे अब है कि अंग्रेजी भाषा के तरफ रुख दे रहे है, जिस के बारे में किसी को कुछ खटकना नहीं. यह सब का कारण सिर्फ इताना है कि उन्हों से पाया हुआ हिंदुस्तान या कि इंडिया का हमें मालिक बनना है लिकीन उसके लिए  गैर-मुल्की लोगों या उन्के नामों को श्रेय नहीं देना है.   विष्टन चर्चील ने जो बुरा-भला कहा है अपने वारे वह पूरी तरह से नकारा नहीं जा सकता.

The list is very long as you say, we need to sieve all of our languages, Marathi, Panjabi, and all  freed of foreign words ingressed sheer out of  our dedication to Persian and English.  The list would indeed be much longer. 

धन्यवाद.

26-11-2023

मेरी टिप्पणी-2  धन्यवाद. जितना कि भारत में दुसरों का लिहाज़ करने का मौका मिलता है शायद ही कहीं ओर मिलता होता. लेकीन जैसे कि गाड़ी चल पड़ी है, जय श्री राम, भारत माता की जय बोल लिहाज़ करना एक दूर की बात बन गई है. असल में ठीक 70 सालों के बाद पाकिस्तान को सही मायने में मान्यता मिली है. अकबर, औरंगाजेब को नागवारा करके जाने उनके हाथ में थमा दिया है समझो. यह सब आप की अमानत है, आप को मुबारक... सॉरी.. अभिनंदन, बढ़ाई हो.

 मुबारक या और सारे शब्दों को चुन चुन कर निकाल दिया जाय, तो फिर असली भारतीय चैन की निंद सो पाएंगे.

अहम बात तो यह बन जाती है कि सारी हिंदी फिल्म इंडस्ट्री को भी पाकिस्तान की अमानत मान कर सरहद पार कर देनी पड़ेगी.

27-11-2023


मेरी टिप्पणी-3 कहीए तो अलिगढ़ सही लगता है या कि हरिगढ़? आदत से लाचार को ठोक्कर ज़रूर लगनी है. चाहे आप कोन भी हो, यहां के कि वहां के.

एक बार एक वहां के बंदे के साथ टैंन में मुझे सफर करने का मौका मिला था। मुझे उनकी हिंदी सुनकर उठखड़ा होना पड़ा. एक सुद्ध हिंदी जो वे बोलते थे और आम हिंदी जो हम सुनते आये हैं उसमे बहुत ही फ़र्क दिखा. The list is very big जैसे की आपने कहा, असल में वह है the list is very very big.

अलिगढ़ के साथ साथ हिंदी फिल्म जगत को भी खोने के लिए तयारी बतानी जरूरी है. जो किसी की भी यह अमानत हो ले जाय!

पाकिस्तान किस कारण से बना था? अभी 70 सालों के बात उसके जान मे जान डालने का मौका मिल रहा है. लाहोर में फिर से रौनक भर आयेगी. अमिताभ बच्चन को अपने और भी जायदाद हाथ से गवांकर लोहोर के लिए परमिट लेनी पड़ेगी.

कारण सिर्फ यह कि अभी हम सुद्धी करण करने पर उतर आयें हैं. पाक हम बनना चाहते हैं और हिंदुस्तां पाकिस्तान बनेगा. 

A reverse flick. 

7:19 a.m. 27-11-2023   To FB at 8:02 am


रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

धार्मिकता पेक्षा जातीयता श्रेष्ठ

Israel Hamas War : इजराईलला मराठी ज्यू कसे पोहोचले, महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून गेले?

माझी टिप्पणी- काही लोकानां देवानिर्मित जातीयताला न जुमानता स्वतःचा धार्मिक कलला प्राधान्य देण्यात  आपले जीवन व्यतीत करणे  अस इथे इजराईलची कल्पनामध्ये जाणवतं.  वास्तविक्ताचा मागे  न लागून काहीतरी आदर्श, कृत्रीम वाट धरून आपली धन्यता याच्यातच आहे असे समझून  घेणारे लोक आपल्या जगाचा पदरात पडलेले आहेत ते एक महा दुर्देवी बाब आहे.  अगदीच वाईट गोष्ट म्हणजे इजराईलचा बरोबर आपले भारत-पाकिस्ताना ची सुद्धा ही एक दुर्देवी भूमिका आहे.  भारत ह्यात तर एक पुढारी देश आहे. आणि त्याच्यातला मुख्य पुढारी तर 56 इंच छाती धरून अडग ऊभे आहेत.  ह्या सगळ्यांचा निरसन कधी होईल की देवाची मनाची गोष्टिच्या प्रमाणे आम्ही सुखचैननी राहायला लागू?

20-10-2023

रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

देवाची मनाची गोष्ट अगदीच वेगळी

मूळ लेखाकडे जायला -  लोकमत_20230814

भारत गुलाम का बनला?

डॉ. विजय दर्डा (चेयरमैन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

लोकमत वृत्तपत्र, दिनांक १४-०८-२०२३


माझी टिप्पणी: 'भारत गुलामका बनला?' याचा अर्थ भारत आज गुलाम नाही असा होत नही. खर तर 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव  आपण असे म्हणून साजरा करतो की भारत गुलाम तर आहेतच पण फरक इतका आहे की आता त्याची गुलामगीरी स्वनिर्मित आहेस्वावलंबी आहेआत्मनिर्भर आहे,   आणि त्याप्रमाणे देश स्वतंत्र आहे.

लेखकांचे प्रश्न हा आहे की 'भारत गुलामका बनला?' की 'स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना या प्रश्नाचा विचार केला तरच भारताची कळ काढण्याची हिंमत पुन्हा कुणी करणार नाही!'

भविष्यात जे कुणी असू शकते त्यांना हिंमत असो किंवा नसोपूर्व सारखा गुलामगीरी करवून घेण्याचा आनंद नक्कीच मिळणार नाही कारण की आता भारत स्वतःहून इंग्रजांनी शिकवून दिलेली गुलामगीरीऔरंगझेबनी शिकवून दिलेली गुलामगीरी शिस्तिने जे पाळत पाळत पुढे येत राहिलेलो आहेत आणि अशे होऊन त्याची 76 वर्षें सुद्धा ओलांडलेली आहेत.

 खर तर मोहम्मद गझनीतैमूरलंगनादिर शाह किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या जितके कौतुक करता येत इतकी कमी पडते.  परंतु भारतापेक्षा अगदी जगाचा किरकोळ प्रांतावरून आलेले हे लोकांना दाद देण्यात भारत अजिबात तयार नाही याची नोंद करणे गरजेचं  आहे.   एक तर किरकोळ प्रांतातले लोकजस की लेखात लिहिल्याप्रमाणे अटलजींना सांगण्यात आले होते की -  गझनीला कशासाठी जायचेते काही पर्यटनस्थळ नाही. बरे म्हणावे असे हॉटेलही तेथे नाही!  आणि तशच ईस्ट इंडिया कंपनीची मातृभूमीम्हणजे ब्रिटेन बद्दल सांगण्यात यावे तर ती एक बेत आहेइतका छोटा की एक माहाराष्ट्राच्या क्षेत्रफळामध्ये तीन असे बेत समावले जाऊ शकते.  त्यामूळे लोकांचे एखादी सुक्ष्म जागातून येणे,  लांबून प्रवास करून येणे आणि सगळ्यात महत्व म्हणजे भाषांची अडचणी न जुमानता पुढे जाऊन इतकेच नाही की एखादी लढाई जिंकणेपण पुढे जाऊन लोकांना आपली भाषा गिरविणेआपले लोकतंत्रराज्यतंत्र कशे चालवाचे त्यांचे धडे शिकवणे आणि अशे म्हणूनच हिंदुस्तान किंवा इंडिया अस्तित्वात आणून देणेते जे आपण उपभोगतो आहोत ते सारे करून देणें हे काय किरकोळ गोष्ट नव्हतीच की.  

पण आपल्याला त्यांचे कौतुक करणे ते मनात बसणार नाही.  असे म्हणणे रास्त आहे की  गुलाम आपला मालकाची कधिच कौतुक करणार नाही.  अन्यथा गुलाम आणि मालका मध्ये फरकच काय राहणार?  आणि एकदाचे गुलाम कायमचे गुलाम अस समीकरण इथे होत आहे. मालकांनी बांधुन ठेवलेली साखळी तोडता कामा नाही अशी खबरदारी भारत बाळगून बसलेला आहे.  

एक बाजू अशी आहे की भारत एक बाजू आहेआणि बाकीचे जग दूसरी बाजू. भारताला ह्याह्या देव लागू पडतेहा हा खाऊ लागू पडतेअशे अशे पथ्य लागू पडतेअशे अशे सण लागू पडतेकाही एखादी विशेष संस्कृती लागू पडतेइत्यादीइत्यादी. भारत म्हणजे हे आणि हे.    ज्याना नकोय हे सगळे त्यांना देश सोडून जावे अशी विनंती सतत असते.

अशे असूनही प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी वसुधैव कुटुम्बकम ही तात्विक संकल्पना सतत मांडत असताना आढळतात.  कारण की त्यांचे  सतत जगाचा दौरा करणे योजिले असते. वसुधैव कुटुम्बकम मध्ये जगाच सर्व काही समावेशक असते.  इंग्रजजर्मनरूसीचीनीहे सर्वकाही समावेशक असत. कशे खाऊकशी संस्कृती सर्वकाही समावेशक असते. जगाच काहीही देवाज्ञा बाहेर नसतच की अशी समझ!

पण हे तर गोंधळच मचावणारनाही का?  खर तर हे मोदीची 'मन की बातमध्ये  किती बसणार?  ते तर असु द्यागांधीजीला सुद्धा हे नको असेल.  इतक्या पराकाष्टानी हा देश स्थापित केलेला आहे की त्यात हे नकोते नको आणि ज्यामूळे पाकिस्तानाची सुद्धा वाट मोकळी केली.  ज्यामूळे सिंधीपंजाबी आपआपले घरबार सोडून भारतमाता की जय म्हणायला पूढे सरकले.  पण हे तर काय ह्यासाठी की देवाची मनाची गोष्ट (म्हणजे वसुधैव कुटुम्बकम) पुढे सरकावे?  आजिबात नाही.   आम्ही आपआपले मंदीर बांधून देवांला त्यात कोंडून ठेवू. त्यांची काय ताकत की ती आमच्या मनाविरूध घोषवाक्य काढेल

 पण देवाला सगळ्यांचा बघावे लागतेनाही का?  अशे थोडी न आहे की ते भारतीयांशी च  आपले मन जुळवणार आणि बाहेरचे लोकांना बाहेर उन्हात ताटकळत ठेवणार?  भारतामध्ये किती किती पूजा पाठ होत असतंबहुदा फार पूर्वीपासून.  की देवाशी सलगी जोडायला काही दिवस उपवास ठेवायचा.  नॉन वेज (मांसाहार) अजिबात नकोय कारण की ते काही दिवस देव खाली वाकून प्रखर्शानी बघतो.   बाकीचे दिवसात हे खाऊते खाऊ पण गायां नकोच नको. गायांची बाबच वेगळी.  पण हे सगळ केल्यावर सूद्धा देव गायखाऊ अंग्रेजांना पाठवतो !  राज करालया पाठवतो.  म्हणजे की आपआपला मानवलेला देवाच्या पाठिंबा बळकावून सुद्धा भारताला मानकरी मिळाली ते एक इमानेइतबाराने गुलाम व्हायची !

 खर तर भारताला ताबडतोब वैष्विक दर्जा देणे भाग आहे. जस की वसुधैव कुटुम्बकमचा आशय आहे.   एकदाचे भारताची सीमा रेषा मध्ये विष्वची सीमारेषा शामील केली की एक मोठी चिंता च मिटली.  सध्याचे तामिळतेलुगुगुजरातीमराठी .... जोडिला इंग्रजजर्मनरूसीचीनी, ...इत्यादी होणे भाग आहे.  कुठली आमचे संस्कृती आणि कुठली देशाबाहेरची याच विरंगुळाच राहणार नाही.  देशच समजा विष्व झाले तर तुम्हाला सग्ळांशी हातमिळवणी करणे भागच आहे आणि तेच करण्याची आता आवश्यकता आहे. आणि इथे इतर लोकांना शिकायची गरज नाही  जितकं की स्वयं सध्याचा भारताला शिकायची गरज आहे.  सरदार पटेलचा पुतळा ऊभे करून देवाचा विरोध कितीदा करत राहणार हे भारत!

वसुधैव कुटुम्बकम ही तात्विक संकल्पना त्यात इस्ट इंडिया कंपनी समावेशक होती आणि मोहम्मद गजनी सुद्धा. त्यात संबंधित बोंबेआणि औरंगाबादला नाकारणे ती तात्विक संकल्पनाशी जुळत नाही. विक्टोरीया टर्मिनस ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस असे संबोधणे ते दूरगामी गुलामांची जात ही करू शकतेत्याची नोंद घ्यावी!

 हिंदू शात्रात ब्राह्मणांचा उलेख म्हणजे देवांशी जवळीक असणारे लोकांचे उलेख.  तर देवानी कुठले ब्राह्मणांना दाद दिली असे समजले जावेलक्षात घेतणे आवश्यक आहे की भारताचा इतिहासात  त्यांनी इंग्रजांमधले ब्राह्मणांला दाद दिली.  ब्राह्मणांला इंग्रजीत जेंटलमेन असे शब्द लागू होतोय. वसुधैव कुटुम्बकम जिंदाबाद.

11.33 सांय, 30-08-2023 

माझी टिप्पणी - लोकमत समाचार

माझी टिप्पणी - Lokmat Times


सोमवार, ५ जून, २०२३

मराठी भाषा, राष्ट्रभाषा

 वॉट्सअप्प मधल पोस्टींग, ताः 03-05-2023


महाराष्ट्रा च्या इतिहास अतिशय माहिती पुर्ण भाष्य या महोदयांनी केले आहे.कोण महोदय ते माहीत नाही.पण आपल्या मुला बाळांना हे माहीत असावे

माझी टीप्पणीः

प्रत्येकाला दुसऱ्यावर वर्चस्व गाजवायचे असते. मराठाही त्याला अपवाद नव्हते. आणि ते ते करू शकले. बहुतांश देशभरात. भारतीय देशभरात.  एक कौतुकास्पद गोष्ट आहे.  तथापि, त्यांच्या कार्यासाठी आपल्याला इतिहासाची पुस्तके पहावी लागत आहे. जर तुम्ही ब्रिटन, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स अशे हे युरोपीय देशांना हे गृहीत धरले तर त्यांनी समुद्रावर मारा केला आणि जगभर वर्चस्व गाजवले.  आणि येथे एक विषेश फरक येतो. तुम्हाला त्यांच्ये कारकिर्दी बद्दल इतिहासाच्या पुस्तकात डोकावण्याची गरज नाही, लहान मुलांना कळकळून हे सगळ्यांच्ये इतिहास बद्दल सांगाण्याची आवश्यकता नाही. कारण काय की त्यांनी आपापली भाषा वापरून तंत्र चालवलं होतं. लोकांना आपली भाषा शिखण्यात भाग पाडले होते. त्यामूळे ते निघून गेल्यावर सुद्धा त्यांची भाषांचा वर्चस्व कायम राहिला.  आणि त्यामूळे युरोपमधले इवळे इवळे ह्या देशांची भाष्यांची व्यापकता इतकी झाली आहे की मूळ भाषा बोलणारे पैकी भाषाला बोलून दाखवणाऱ्यांची संख्या जास्त असे होऊन बसलेले आहे.  

हा व्हिडीओचा आशय आहे की भारताची राष्ट्रभाषा मराठी होवो.   प्रश्न इथे हा अडतो की मराठांनी व्यापक सत्ता गाजवली तरी ती मराठी भाषांची सत्ता नव्हतीच की. खर तर मध्य प्रदेश, छत्तिसगढ़ मध्ये मुबळक प्रमाणावर मराठी आडनाव बाळगणारे लोक आहेत पण ते मराठी भाषा बोलतात की?   जसा राजा तशी प्रजा. राजाची भाषा कुठली, म्हणजे कामाची भाषा कुठली, हे इथे लागू होत. गोवामध्ये 1961 पासून त्यांचा राजा बदलला. अधिकृत पोर्तुगीज भाषा बदलून भारतांची अधिकृत भाषा म्हणजे इंग्रजी भाषा आली.  परिणाम – लोकांचे नाव पोर्तुगीज राहिले पण त्यांची भाषा बदलून इंग्रजी झाली.

आणि स्वतः माहाराट्र सुद्धा दिल्ली कडे तोंड फिरवून नटमस्तक करताएत. दिल्लीची भाषा हिंदी, उर्दू आहे.  आणि आहे मुख्यतः वर सांगितलेले प्रमाणे इंग्रजांनी आपली मागे सोडलेली भाषा, धुमाकुळ गाजणारी एक भाषा, सर्वव्यापी इंग्रजी भाषा.  दिल्लीची भाषा म्हणजे राजधानीची भाषा म्हणजे माहाष्ट्रची भाषा. इथे तर भाष्य अस ठरत की मराठी भाषा लुप्त होवो, न होवो पण  एक भारत श्रेष्ठ भारत होणे आवश्यक आहे.

व्हिडीयोचा मुख्य आशय आहे की मराठी भाषाला भारतीय राष्ट्रीय भाषा बनवणे.  ते एक आवाक्याबाहेरची गोष्ट समजली जाऊ शकते. जे आवाक्याबाहेर नाही ते आहे ते आहे एक महाराष्ट्र, श्रेष्ठ महाराष्ट्र, मराठी महाराष्ट्र.

जर इंग्रजींची व्यापकता इतकी झाली नस्ती,  इंग्रज्यानी  आपली भाषा इतर लोकांना शिखवण्याची तसदी घेतली नसती तर जगाच्या विविधतेवर परिणाम झाला नसता आणि इंग्रजांची  सुद्ध इंग्रजी बोलण्यांतची  लईत बसणारे 'बॉम्बे', 'कलकत्ता' हे शब्द  जगाने गमावले नस्ते.  ही एक दुःखाची बाब आहे.

11.21 p.m. 05-06-2023

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

भारताच्या क्रिकेटमध्ये धमाका!!

 

Lokmat Times _20221121

Blaming players won't bring trophy, Ashok Thakur 

खेळाडूंना दोष देऊन ट्रॉफी मिळणार नाही

अशोक ठाकूर

21-11-2022


माझी टिप्पणी: लेखकाचे म्हणणे आहे की: "खरी समस्या ही आहे की सरकार आणि बीसीसीआय दोघांनाही आयसीसीमध्ये असलेली आरूढलेली सत्ता आवडते." आपण असे म्हणू शकतो की नेहरूंना भारताची 'खूप मोठा देश' म्हणून असलेली आरूढलेली सत्ता आवडली होती आणि ते कोणत्याही प्रकारे गमावू इच्छित नव्हते, तथापि, पाकिस्तानचा भाग त्यांच्या पकडीतून निसटला की. आता भारत क्रिकेटच्या बाबतीत  स्फोटक परिस्थिती घडवत आहे आणि ती आरूढलेले सत्ताधारी लोकांना एक मोठी चिंताजनक बाब होऊन बसू शकते. येथे, लेखकांनी (एक भयंकर) पर्याय शोधून काढला आहे की: ' पुढल्या पाच वर्षात भारत इलेव्हन, हिंदुस्थान इलेव्हन, किंवा अगदी कर्नाटक इलेव्हन, मुंबई इलेव्हन, रिलायन्स इलेव्हन किंवा टाटा इलेव्हन अशे संघ भारतमधून विश्व चषक मध्ये सहभागी नसावे याचे कोणतेही कारण नाही.'

 आता तर असे आहे की,  बॅडमिंग्टन असो किंवा वेटलिफ्टिंग, आणि कुस्तीबळ असो   यासारख्ये विविध प्रकारातील हातात मोजण्या इतक्या  यशांमुळे सध्याचा भारत आनंदी आणि समाधानी आहे आणि ज्या त्या पदक विजेत्यांना पंतप्रधानांनी कौतूक करणे आणि त्यांना सरकार कडून पारितोशीक देणे, भूषण देणे,  बिनकामातले लठ्ठ पागाराच्या नोकऱ्या देऊन सन्मानित करण्यात येते.  पण समजा की क्रिकेट सारख्येच इतर खेळामध्ये देशांचा आकार, लोकसंख्या साजेसा लोकांचा सहभाग व्हायला लागला तर इथे सुद्धा स्फोटक परिस्थिती उतपन्न होईल, जी की तर खर तर झालीच पाहिजे.  जर ते झालं, जेव्हां ते झालं,  तर एक भारत श्रेष्ठ भारत अशे म्हण्यात सुद्धा एक  स्फोटक परिस्थिती उत्तपन्न होईल.  एक हिदू राष्ट्र म्हणून एकता आणि अखंडताचा विचार मांडून ठेवलेला देशाला जगात समावण्यात तडा होऊन बसेल.

 ब्रिटीशांनी कोरलेल्या भारताला देव भला करो! हा एक धर्म निगडित फाळणीचा भारत, एक  लालसायुक्त भारत,  आणि एक दांभिकपणे यूक्त भारताला देवाकडून मदत हवी आहेत!

 भारत आपल्या विविधतेचा ठसा जगात उमटावा त्यापेक्षा ते धर्माला जोडून किवां इतर कारणानीं लोकांना बांधीत ठेवण्यात आपले सर्वकाही लक्ष केंद्रित करते आणि एकताला लागून ठेवण्यात यश मिळविळ्यात ते आपले अभिमान समजते.  भारतांचे 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी केवळ 14-15 लोकांना क्रिकेट, किंवा फूटबॉल, किंवा होकी अशे क्रिडांगण मध्ये खेळू देण्यात राजकर्त्यांना समाधान वाटत असेल तर ते अनअवघानाने मोठी चूक किंवा खर तर पाप सुद्धा करता  आहेत ते आता क्रेकेट मधले स्फोटत परिस्थितितून कमीतकमी कळायला झालं तर एक अत्यंत मोठी बाब होईल.  या लेखकाने अगदी बरोबर नमूद केल्याप्रमाणे 'आम्हाला राष्ट्रीय संघासाठी फक्त 14-16 खेळाडू निवडावे लागतील ही फसवणूक आहे.'   या लेखकांचा कौतुक करणे हे एक माझ्या खोल मनाची बाब ठरत आहे.

 क्रिडांगण मध्ये राजकारण नको. भारत म्हणून एक कुटील राजकारण लोकांपासून लांब ठेवण्याबाबतीत कोणी पाऊल उचलेल, ह्याची अपेक्षा राहून राहिलेली आहे. 

  दुपारी 12.48 25-11-2022


पूर्ण ब्लॉग वाचाः  -  मराठी अमूल्य जग

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

भारत एक कल्पना

 Lokmat 20221115

 इंग्रजी की भारतीय भाषा?

15-11-2022

माझी टिपण्णीः एक संघटीत देश जो आपल्याला लाभला आहे तो आपले ब्रिटीश माय-बाप कडून लाभलेला देश आहे. हे विसरता कामा नये.  आपण कुठले ही नामकरण करू, इंग्रजी भाषातले नाम बॉम्बे चा मुंबई करू, विक्टोरिया टर्मिनस ला छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करू, इंग्रजी माय-बाप कडून आपल्याकडे ऋण एक कायम स्वरूपी ऋण ठरत आहे.

त्यांनी तर काही चूक केलेली नाहिए.  आपली भाषाचा पुढाकार करणे काही पाप नहिए.  पण त्याच प्रमाणे आप आपले स्वतःची देवाकडून लाभलेली भाषेला मागे ठेवणे हे एक पाप अवश्य होत.

इथे अस समजणे कि भाषावाद नको, जातिवाद नको ते एक देवाचा वजाबेरीज बसत नही. आपापले ध्वज घेऊनच उभे राहाचे असते. मराठी असो की कन्नड की काश्मीरी.  आपापली ओळख प्रयत्नपूर्वक जगा पुढे आणून, जागाची विविधता मध्ये आपली सुद्धा भर पडली गेली पाहिजे जस की इंग्रजानी कर्तव्यनिशी केली आहे. 

अस केल्यानी सगळ्यच काही आपापल्या चौकटीत पडेल.  एक कश्मिरी नुस्त आधी काश्मिरी बनुन संतुष्ट राहिल. 

एक भारत, श्रेष्ठ भारत न म्हणता अनेक भारत, श्रेष्ठ भारत असे म्हणने रास्त होईल.  तेव्हां तर भारत मध्ये पाकिस्तानला सुद्धा शामिल राहणे रास्त होईल. भारत एक देश नव्हे, तर एक कल्पना म्हणून राहिले पाहिजे.

5.54 p.m. 17-11-2022 


पूर्ण ब्लॉग वाचाः  -  मराठी अमूल्य जग