गुरुवार, ९ जून, २०२२

वेचून वेचून मारणे

 मूळ लेखासाठी येथे दाबा - Lokmat-Kashmir-files

काश्मीर फाइल्स-2 

जुन 04, 2022 लोकमत


माझी टिप्प्णीः  काश्मीर फाइल्स–2 होऊ न देण्यासाठीच तर लोकाना वेचून वेचून मारले जात आहे.  काश्मिरी पंडितांचा परत शिरकावच करायला अवघड होऊन बसत असेल तर काश्मीर फाइल्स–2  नंतरची गोष्ट आहे.  आपल्या मता प्रमाणे बहुसंख्य काश्मिरी जनता शांतताप्रियच आहे.  तर त्यांना कमीत कमी  कलम 370 निष्प्रभ करताना विचारल गेलं होतं कात्याउलट कलम निष्प्रभ केल्यानंतर महिने चे महिने  संचारबंदी लागू केली गेली होती, स्थानीय नेताना सुद्धा कोंडून ठेवले गेले होते ते तर काय दर्शवितात?

दहशतवाद केव्हा होत?  तेव्हा होतं जेव्हा त्यांना जे हवे असत ते काहीही करून सरळ पद्धतीने, लोकतांत्रीक पद्धतीने मिळण्याचा पलीकडे असते.    विकास असो किंवा नसो, लोकांचा कल कुठेही असो, मनाचा विचार कुठला ही असो, भारताला काश्मीर बद्दल आपला स्वतः मांडलेला  ध्येय सोडायचा नाहीं  म्हणून तर सगळ्या घडामोडी चालू आहे.  हे तर लोकानां समझलच पाहिजे. आपल्या कडून सुद्धा त्यांच्यावर दहशतवाद होत आहे ते सुद्धा भारताच्या वृत्तपत्रात नोंदले गेलं पाहिजे.

भारताची मत मांडणी कदाचीत अशी ठरत आहे की पाकिस्तान काश्मिऱ्यांच्या हातात हथियार पुरवत बसल आहे.  त्यानी अमेरिकमध्ये हथियार बाळगणारे माथेफिरू लोकांकडून  होणारा अंदाधुंद गोळीबाराचा मानसिक आजार काश्मीरला सुद्धा लाभला आहे आणि त्याचं उत्तर म्हणून बंदुकधारियांना वेचून वेचून मारणे हेच सर्वोत्तम उपाय ठरत आहे.  जणू काय एक कोरोना वायरस. वायरसला नेस्ताबूत केल्यानेच जीव भांड्यात पडेल.  आणि त्यात  भारतियांच्या पाठिंबा आहे.  एक बाजू भारतियांची एक इंग्रेजांनी बनवून दिलेला प्रचंड आणि अवास्तव देशाशी देशभक्ती पणाला लागली आहे आणि दूसरी बाजू समोरचा चिमुकल्या  आणि नैसर्गीक वास्तवानी रमलेला पक्षांची देशभक्ती म्हणजे की आपल्या मताला दहसतवाद अजून तरी कमी पडताना दिसत नाही.

12-09 दुपार, 08-06-2022

 

माझी टिप्पणी 2 -  हे लेख ब्रिटिस काळीन वृत्तपत्रात जणु छापला गेला असता.  तेव्हाची जनता सुद्धा शांतताप्रियच होती.  पण त्यात भगत सिंह, सावरकर सारखे जन्माला आले होते आणि ब्रिटिषांना त्याने त्यांना वेचून वेचून काढण्यात भाग पाडले होते.  पण इथे एक विशेष फर्क देसतोय.  तेव्हा लोकानां वेचून काढून, त्याक्षणी मारून टाकण्याची प्रथा नव्हतीच की.  आजची परिसस्थिती साम्य असताना सुद्धा महा भयंकर आहे असा उल्लेख करण्यात काय हरकत आहे का?

काश्मिऱ्यांचे एखादे वृत्तपत्र छापले जात असते तर तिथे असं वाक्य नजरात पडत असेल की भारताकडून आपले देशभक्तांना वेचून वेचून मारण्याची प्रथा कायम चालूच ठेवली आहे!  

आजच्या दिवशी जर गांधी असते तर गांधीजीची काय अवस्था झाली असती.  खर तर नवीन भारतात नथुराम गोडसे सारख्यांचा काळ लागला आहे आणि त्यात लेखण्याजोगी बाब असी आहे की बहुतांश लाकोंचा त्यात संपूर्ण पाठींबा आहे.  

6.55 सकाळ  09-06-2022

पूर्ण ब्लॉग वाचाः  -  मराठी अमूल्य जग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा