माहाराष्ट्र टाईम्स
20-03-2020
घटनात्मकतेची भाषा
माहाराष्ट्र टाईम्स मधील लेखः 'हिंदी ही देशाची राजभाषा व्हावी
यासाठी मुंबईतील राष्ट्रभाषा महासंघ, मुंबई राष्ट्रीय राष्ट्रभाषा प्रचारसभा
आदींसह काही संस्थांची याचिका फेटाळून मुंबई उच्च न्यायालयाने 1963च्या अधिकृत
भाषा कायद्याची घटनात्मकता उचलून धरली आहे. हा कायदा घटनाबाह्य असल्याचा दावा करीत
इंग्रजीचा वापर थांबविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका 17 वर्षांपूर्वी दाखल
करण्या आली होती. तिच्यावर निवाडा देताना न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. नितीन
बोरकर यांच्या खंडपीठाने या कायद्याच्या घटनात्मकतेबरोबरच संघराज्यातील राज्यांची
भूमिकाही अधोरेखित केली आहे. ‘राज्यांशिवाय
संघराज्य अस्तित्वात येऊ शकत नाही; त्यामुळे सरकारी कामकाजातून इंग्रजीला हद्दपार करायचे
असेल, तर याबाबत सर्व राज्यांचे मतही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्यांचे
मत विचारात घेण्याची 1963 च्या कायद्यातील अट योग्य असून, ती घटनाबाह्य नाही,’ असे
न्यायालयाने स्पष्टपणे सांगितल्याने या बाबतची संदिग्धता आता दूर व्हायला हवी.
देशात हिंदी भाषकांचे प्रमाण सर्वाधिक आहे यात शंकाच नाही. मात्र, केवळ या एका
कारणामुळे हिंदी ही एकमेव राजभाषा करणे मराठीसह अन्य भाषांवर आणि भाषिकांवर अन्याय
करणारे आहे. बहुविधता हीच भारताची निजखूण आहे. धर्म, पंथ, जाती यांपासून भाषा-संस्कृती
यांपर्यंत भारतात कमालीची विविधता आहे. हे वैविध्य नाकारून देशाला एकसाची करण्याचे
कोणतेही पर्यत्न, भारतीयत्वाचा विरोधातील ठरतात. हिंदीला राष्टीय भाषेचा दर्जा
देण्याबाबत होणारी मागणीही अशाच पर्तयत्नांपैकी एक आहे. देशातील प्रत्येकाने
आपल्या मातृभाषेशिवाय दुसरी किमान एकतरी भारतीय भाषा शिकावी, असे म्हणत साने
गरुजींनी आंतरभारतीची संकल्पना मांडली होती. प्रत्येक भारतीय भाषा सक्षम करतानाच
ही संकल्पना पुढे नेण्यातच आपल्या सर्व भाषांचे हित आहे.'
Maharashtra Times, 20-03-2020 3rd Editor’s column.
माझी टिप्पणीः इंग्रजांनी जर डोळे उघडल तर ते स्वतः एक बाजु आणि बाकी सगळी विविधता त्यांचे दूसरी बाजु असं होतं. त्यांनी स्वतःची ओळख न दडवीता जगाची असंख्य विविधता मध्ये आपले पाय पसरावले आणि मनसोक्त आनंद लूटले.
हाच ते
ईंग्रजांच्या प्रमाणे मराठी भाषिकां साठी जग कधी केव्हां उघडणार त्या बद्दल कुठे
काय कोणाला प्रश्न पडत नाही, हे एक लाजास्पद बाब आहे. देवाने सर्वांना घडवलेले आहेत. जशी की ती अंग्रेज संस्कृती, तशीच की ती मराठी
संस्कृती. अंग्रेजांचा समोर पूर्ण जग उभे राहते, पण मराठी भाषिकांचे पुढे आधी भारताचा वर्चस्वाला समोरे जावे लागते. खर तर भारतच जग आहे, भारत म्हणजेच जग. श्रीराम-कृष्णचा जग. पण आमही हा राम-कृष्णचा जग
आपल्या मनाजोगे संकुचित करून ठेवलेला आहे. देवाला आपल्या मनाप्रमाणे समझा की
अपमानीत करून ठेवलेले आहेत.
जर्मन
असो, चीन असो, रूस असो, त्यांचे डोळे उघताना अंग्रेज सारखेच एक बाजु ते स्वतः
म्हणून उभे असते आणि बाकीची बाजु त्यांना पूर्ण जग पाहण्याची मूभा आहे. तर मराठी, आणि
इतियादी भारतिय भाषिकाला किती दिवस पूर्ण जग न बघता स्वतःला कोंदमरून ठेवावे
लागणार आहेत?
आम्ही खरच
की अंग्रेजा पासून स्वतंत्र झालो आहोत की आणखीनच
वाईट परिस्थितीत प्रदार्पण केला त्यात एक रास्त मत असू शकतो. इंग्रेज असताना आमची जबाबदारी स्वतःभोवती स्थानिय
वातावर्णात रंगलेली होती. त्यात संदिग्धता
अवश्य नव्हती. त्यामूळे स्वतः स्वतःची स्थानीय
सस्कृतीची बाजू ठाम होती. तेव्हां देशाला एकत्रीत ठेवणे ते इंग्रजांची जबाबदारी वर
होती. त्यांच्याच हे इंडिया म्हणून एक स्वतःवर
लादलेला जिवलग प्रकल्प होता.
स्वतंत्रता,
आणि त्याबद्दल हर्षोल्लास. पण त्याने देशाला एकत्रित ठेवण्याची जबाबदारी आमची बाजु म्हणजे आमचे
विविधतानी नटलेल्या घटकाखाली अधोरेखित झाली. त्यामूळेच तर झाली आहे गैरसमज.
आम्हाला स्वतःची ओळक थांबवून दुसऱ्यांचे पात्र ओढून घ्यावे लागले आहे. एक निष्पक्ष पात्र, पण खर तर भारतिय होऊन कृत्रिम अंग्रेजांच पात्र ओढून
घ्यावे लागले आहे.
आता तर हे सगळ ओळखून प्रश्न विचारणं आवश्यक आहे की आपण किती दिवस हीच ती पूर्वीची इंग्रजांची जबाबदारी, इंग्रजांचं काम करत राहु? कधी आम्ही इतर देशां सारखे
स्वतंत्र होऊ? जेथे एक बाजु स्वतःची मातृभाषा होणं आणि दुसरी बाजु एक संपूर्ण
विविध जगाची विविध मातृभाषाची संकल्पणा लाभणं? कस काय म्हणून आपल्या भारतउपखंडा
पैकी नुस्त बांगलादेशालाच खरी स्वतंत्रता लाभली आहे? अशी काही प्रश्न कोणी कस काय विचारत नाही?
लेखात हे
आपल विधान अगदी योग्य आहे – ‘वैविध्य नाकारून देशाला एकसाची करण्याचे कोणतेही पर्यत्न, भारतीयत्वाचा विरोधातील ठरतात.’ पण ते आणखी चोखपणे योग्य करायचे असेल तर भारताची व्याख्या म्हणजे विश्व, पूर्ण जग असं ठरविले गेलं पाहिजे.
जापान समझा
की आला त्यामूळे भारतामध्ये, आणि समझा की आपल्याला मनात असं आलं की महाराष्ट्राला जापान कडून उदाहरण घेतल गेलं
पाहिजे, त्यांची जापानी भाषाचा संदर्भ मराठीला
लागू केलं गेलं पाहिजे तर मराठी भाषाला सक्षम करायची आवश्यकताचा प्रश्नच उरणार नाही. ती आपोआप सक्षम होण्याच्या पथावर
होईल. जापानी लोक, किंवा कॉरेयन, किंवा रूस इत्यादी आप आपली भाषांशी किती संलग्न आहे त्यात कुणाला दुमत नसेलच
की, अशी आशा.
आपल्या लेखाप्रमाणे ‘ही
संकल्पना पुढे नेण्यातच आपल्या सर्व भाषांचे हित आहे.’
12.30p.m. 23-02-2020 for the shoot to MT
अधिकसाठी खालील डाव्या किंवा उजव्या बाणावर क्लिक करा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा