My comment: जगाचा व्यासपीठावर वेगळी वेगळी भूमिके असते. त्यात होऊ शकते गिधाडची एक भूमिका, बालिकाची एक भूमिका आणि छायाचित्र
बातमीदारची एक भूमिका. आपली भूमिका यशस्वी
रीत्यानी पार केल्यावर कुणी सांगितल्यावरून
बातमीदाराला वाटल की आपल्या कडून आणखी एक चांगली भूमिका करायला राहून गेली आणि
त्यामूळे आपल्या ह्या जगात जगण्या पेक्षा मरण बर. हे एक चुकीचा अंदाज ठरला कारण की
कस काय त्यानी ठरवलं की आपल्या कडून छायाचित्र-बातमीदारावाचून खरच आणखी काय काम करता
आलं असतं? अस सांगण्यात हरकत नाही की बातमी टिपणारे बातमी बनवत नाही.
तसच इथे मजूर आपली जगात आहे
आणि ‘गिधाड’ जे आपल्याला बातमी पुरवतो तो आपली जागा धरून
आहे. नेहमीची भुलचूक माफ.
24-05-2020
मूळ लेख - वॉट्सअप्पवर फिरणारा
जुन्या मित्रांना हे छायाचित्र
अवश्य आठवत असेल त्याचं शिर्षक होतं "गिधाड आणि बालिका"...
ह्या छायाचित्रात एक गिधाड
त्यातील लहान मुलीच्या मृत्युची वाट पाहतो आहे.दक्षिण अफ्रीकेचे छायाचित्र-बातमीदार
श्री.केविन कार्टर यांनी मार्च 1993 मध्ये सुदान मधील दुर्भिक्षावेळी हे छायाचित्रण
टिपलं होतं.त्यासाठी त्यांना "पुलित्जर प्राइज" प्रदान करण्यात आले.आश्चर्य
म्हणजे इतका मान सन्मान मिळूनही श्री. कार्टर यांनी वयाच्या 33 व्या वर्षी आत्महत्या
केली.
प्रश्न असा विचारला जात होता
की आत्महत्येचे कारण काय?
सत्य हे होते की श्री.कार्टर
हा सन्मान मिळाल्याचा आनंद अनुभवत होते त्याच दरम्यान टिव्हीवर त्यांच्या सन्मान सोहळ्याचे
प्रक्षेपण ही सूरु होते. त्यामुळे टेलीफोनवरील त्यांच्या एका साक्षात्कारात त्यांना
एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की *"महाशय,शेवटी
त्या मुलीचं काय झालं पुढे?"
त्याच्या उत्तरादाखल श्री.कार्टर
म्हणाले होते "मला सांगता येणार नाही.कारण मी जरा गडबडीत तिथून विमानाने परतलो
होतो."
"तिथे किती गिधाडं होती
बरं?"त्याच
पत्रकाराचा पुढचा प्रश्न.
"मला आठवतं तसं ते एकटंच
गिधाड होतं"कार्टर उत्तरले.
"मला वाटतं तिथे दोन गिधाडं
होती,त्यातील
एकाच्याहाती त्यावेळी कॅमेरा होता."
त्या कटाक्षाचं महत्व लक्षात
आल्यामुळे श्री.कार्टर अस्वस्थ झाले आणि त्यांनी आत्महत्या करुन घेतला.
कोणत्याही परिस्थितीत माणुसकी
सुटयला नको हेच खरं.
जर श्री.कार्टर यांनी त्या
असहय व भुकेने विव्हळणाऱ्या बालिकेला अवघ्या अर्ध्या मैलावरील युनायटेड मिशन्सच्या
कार्यालयात पोहचविले असते,जिथे
ती पोहोचण्याचा प्रयत्न करीत होती.तर कदाचित आज ती बालिका व श्री.कार्टरही जिवीत असते.
पूर्ण ब्लॉग वाचाः - मराठी अमूल्य जग
अधिकसाठी खालील डाव्या किंवा उजव्या बाणावर क्लिक करा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा