सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

भारत म्हणजे स्थानीक लोकांचे मानस दुर्लक्षीत!!

Link to click:

डॉनचा मानभावीपणा


माझ म्हणणं जर 5 ऑगस्टच्या कारवाही नंतर काश्मीर खोऱ्यात फटाके उडवले गेले असते तरीच ही गोष्ट खरी सामाधानाची झाली असती असे म्हण्यांतच तथ्य आहे.  आता तर ही लढाई भारत आणि काश्मिरी जनता मध्ये चालू आहे हे विशेषरूपाने म्हणणं रास्त आहे.  त्याबाबतीत काहीही गैरसमझ नाहीये ज्याप्रमाणे तिथले लोकांचे तोंड बंद करण्याची पूर्व तयारी दाखवली गेली त्यानी हे स्पष्ट  होते. पाकिस्तान बाहेर बसून बधीर होऊन रडगाणं करत आहे आणि अखेरपर्यंत करीत राहणार असे ह्या लेखात वर्तविले आहे. कारण काय की भारत एक बळाढ्य देश आहे आणि लेखात लिहिलेल्या प्रमाणे भारताने केलेला सर्जिकल स्ट्राइक अनुभवल्यानंतरही त्या देशाचे सरकार व विचारवंत अजून वास्तव लक्षात घ्यायला तयार होत नाहीत.  म्हणजे हे सगळ चालूच राहणार.  पाकिस्तानच्या हातात, जरी, एक बाळाढ्य भारता समोर त्यांना काय उपाय नसेल, तरी सुद्धा. 
एक विषेश म्हणून बघायला मिळतो ते हे आहे की जर तुम्हाला बळाढ्य भारत हवे असेल तर श्रीनगरचे लोक कशे आहेत, त्यात बाजूला पण वेगळे पहाडी कुपवाराचे लोक कशे आहेत हे जाणून घेण्याची तसदी जरा लांबच ठेवलेलं बरं. आम्ही तिथे सहलीला गेलो असताना निश्चत अशे नानविध प्रकार बघतो पण श्रीनगर वाल्यांना काय आवडतं, काय नाही,  कुपवारांची काश्मीरी भाषा कशी असते, नसते, ह्यांचा विचार काय, त्यांचा काय ते जाणून घेण्याची मुभा बळाढ्य भारताला नसते. आपण 130 करोडचे लोक एकत्रीत बांधलेलो आहोत. इतर इतर देशांसारखे,  समझा युरोपीय देशांचे उदाहरण घेऊ, स्वित्झरलेंड,  बिल्जियम,  इटली, नाही म्हणायला तरी इंग्लंड हे सगळे भारतापेक्षा अगदी पुश्कळपटीने लहान तरी ते  स्वायत्त, आपले आपले से वेगळे अस्तित्व, भाषा वगैरे सांभाळून जगणारेच्या प्रमाणे आम्ही होऊ शकणार नाही कारण आम्हाला एक, एकजीव, एकाग्रातानी व्यापलेला भारत हवाय.  त्यात एखाद्याला स्वतंत्र शांतिमय स्वित्झर्लेंड होणे अशक्यप्राय आहे ते आम्ही चोखपणाने काश्मीरच्या लोकांना, पाकिस्तानला, बाहेरच्ये सगळे देशाला जाणावून दिलेला आहे आणि सगळयांना एक बळाढ्य भारताची भिती व्हावे अशी सुप्त इच्छा आमच्या भारतीयांच्या मानात बाळगण आपलं भारतमाता प्रेरीत करीत आहेत.  
लेखक म्हणतो की डॉन पत्रकारने इतिहास, त्यातील पाकिस्तानचे आर्कमण, संस्थानिकाची भारतात विलीनीकरण करण्याची तयारी या गोष्टी  दुर्लक्षिल्या आहेत. मला वाटतं हे कशाला नाही दुर्लक्षिल्या गेलेला पोहिजे? नुस्त मागे वळूनच कशाला आधार मांडण्यात जात आहे आपल्याकडून? आजचे दिवस, वर्तमान स्थितीत, आपलेच गल्ली-बोळात, आपल्याकडचं काश्मीर मध्यले गल्ली-बोळात लोकांच कल काय आहे, इतके वर्षांनंतरचे कल काय राहिला आहे त्याचा आधार का बरं समोर ठेवणे आपल्याला अशक्यप्राय होत आहे?  त्यांच्या कडून इतिहास दुर्लक्षित केली जात आहे, असे म्हणणे तुम्हाला योग्य वाटत असले तरी  आपल्याकडे सध्याची वस्तुस्थिती जे जास्त वैध समझलं गेलं पाहिजे  – स्थानीक लोकांचे मानस -  ते आपण दुर्लक्षित करीत आहोत आणि परतफेरीत तसंच सांगता येईल की जे आपल्या सोयीचे ठरत नाही ते निवडायचे व आपली बाजू पुढे रेटायचीहे त्यांच्याप्रमाणेच आपला सुद्धा धोरण आहे.   
पण नाही म्हणता येणार नाही की सध्याचा राज्यपक्ष अत्यंत प्रगतिशीळ, अ-निराषावादी पक्ष आहे.  मनात जे काही आहे ते करून सुद्धा दाखवणे ते फार प्रशंसनीय आहे. बरेच काही हलावून टाकणे त्यांची सक्षमता त्यांच्यात आहे.  त्यामुळेच तर पाकिस्तनला उठून उभे राहण्यात भाग पडला आहे आणि त्यानी हाती परिणाम पडण्याची मूभा वाढली आहे, फार शक्यता उतपन्न करणारी गोष्ट आहे.  त्यात एक गोष्ट आहे की, शक्यता या बाजूला पडो किंवा ते बाजूला.  
काश्मीरचे राज्य म्हणून सध्याची संपलेली परिस्थिती  पुन्हा बहाल करण्यात त्या आधी विलीनीकरणाची प्रक्रिया अधिक एकजीव केली जाईल.हा विधानाच्या तातपर्य एकच आहे की काश्मीरी लोकांना, म्हणजे सध्याचे नेमके विरोधी मुस्लिम काश्मीरी लोकांना त्यांच्या प्रदेशातच राहून त्यांना हरवून घेणे असं होतं. म्हणजे उदाहरण दाखिल मुंबईत माराठी माणूस हरवलेला आहे तसं.  मुंबई जसा भारताचा अनूठा नमुना बनून बसलेला आहे की नाही की ते संपूर्ण मराठी, नाही गुजराती, नाही उत्तर भारतीय.  तसच काशमीर सुद्धा एक काश्मीरी विशेष पैकी एक समग्र भारतीय नमुना असे करून घेणे हेच एक मात्र आदर्ष विकल्प हाती भारताने घेतलेला आहे ते प्रांजळपणानी डॉनला किंवा म्हणजे पाकिस्तानला दिसत आहे आणि तेच त्यांना काही अस्वस्थ करणारी बाब ठरली आहे असा अंदाज करता येतो.  
ह्या सगळ्यातून निष्पन्न हे होत की भारत म्हणजे सर्वप्रथम एक विशेष हिंदू राष्ट्र जो एक सुक्ष्मशी काश्मीरच्या सीमेवर उभा थडकला होता ते अनिसर्ग रीत्यानी का होईना इतके वर्षांच्या अडचणी वर काबीज करण्यात सद्या तप्तरता दाखवीत आहे. एक हिंदू राष्ट्राचा समोर एकाला काश्मीरी होणे न होणे के एक तुच्छ गोष्ट आहे. जस की एखाद्याने मराठी होणे किंवा नाही होणे. भारत आणि पाकिस्तान ज्यांच्या सिद्धांतामूळे फाळणी झाली ते आम्ही कधी नाकारणार नाही. धर्मसंकटाची सावली खालीच राहून आम्हाला म्हणायचे आहे, भारतमाता की जय आणि स्वतःला प्रफुल्लीत समझायचे त्यात!

2.52 दुपार, 16 सप्टेंबर, 2019





माझे अन्य ब्लोग्झ


अधिकसाठी खालील डाव्या किंवा उजव्या बाणावर क्लिक करा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा