"लोकप्रभा" वर क्लीक करून पूर्ण 'विचाराचा' लाभ घ्या
महात्मा गांधींचा इतका द्वेष का? - विचार
(डॉ दत्ताहरी
होनराव; लोकप्रभा - 24 ऑगस्ट, 2018)
माझं म्हण्याप्रमाणे (प्रतिउत्तर) - लेखकानी लिहिले - ”फाळणी टाळण्यात
गांधींना अपयश आले हे कुणीही नाकारणार नाही. पण ते का आले, याचा तटस्थपणे अभ्यास
केला पाहिजे.” म्हणजे अखंड भारत टिकविण्यात अयशस्वी झाले, याचा
तटस्थपणे अभ्यास केला पाहिजे. परंतु अखंड भारताचा विचार पहिले कशा मूळे झाला याचा तटस्थपणे
आभ्यास कोण करणार?
समजा की गांधी आणि
जिन्ना सामान्य माणसा सारखे राहिले असते. त्या दोघाना इंग्रजांनी इंग्रजीचा पाठ
गिरवला नसता, किंवा मोगलची देण हिंदी-उर्दुचा पाठ गिरवलां गेलां नसता तर त्यांचे
भांडण गुजराती, म्हणजे गुजरात पर्यंत सिमीत राहिले असते, “ही गोष्ट
सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ” नाहीं का? इतर साऱ्या विश्व मध्ये सामान्य माणसांची भाषा बद्दल कोणी
आक्षेप घेत नाही. त्याला स्वतःच्या व्यतिरिक्त इतर कुठलीही भाषा येणे स्वाभाविक
नसते. जापानीला जापानी भाषाच आली तर वावगे समजले जात नाही.
पण आपल्याला
गुजरात जापान सारखे व्हावे ते अजिबात मान्य नाही. एकदाच गांधीनी इंग्रजी शिकली,
त्यांचा पायपसारा झाला, त्यांना कशाला परत गुजरात गाठायचं? इतक्या मेहनतिनं इंग्रजी वर वर्चस्व मिळविळ,
इंग्लंडला गेले, तिथला अभ्यासला तोंड देऊन यशश्वी रीत्यानी पार केला, दक्षीण
आफ्रिकाला जाऊन झगमगाटिनी आपला इंग्रजमध्ये अभ्यासातला साजेसा उदरनिर्वाह केला,
त्यांना परत येताना आपल्या आपले गांव बरं हे
मनाची तैयारी नव्हती ते प्रखर्षाने जाणवले.
गुजरातला जापान सारखे न लेखणे, त्याला दुय्यम
दर्जा देणे हे सगळं इंगर्जांची फुटीर नीतीला आपण दोष देऊ शकतो. स्वतः इंग्रज सारखा
इंग्रज राहिला पण गुजरातला गुजरात सारखा गुजरात, असा टिकवणे इंग्रजेना ते धोका
पत्कार्णे सारखा झाले असते. आणि गांधी सारखे अनिवासी भारतीय योग्य प्रमाणात त्यांना
बनवता आले सुद्धा. त्यांना आपला ते
राज्य, नीती नियोग सांभाळायला हवे होते. ते त्यांचं निघून गेल्यावर सुद्धा तसेच
राहिले. इंग्रेजांना अप्रत्यक्षरीतियांना
का होईना दर स्वतंत्र्यदिनां आपण त्यांची आपला लोकांना आठवण करून देतो.
ह्यापेक्षा त्यांना चांगली गोष्ट कुठली होऊ शकते?
लिहिलेलं - “या खंडप्राय देशात
एक धर्मातीत शासन उभे करावे आणि ते उभे करणे शक्य व्हावे या दृष्टीने आवश्यक
असणारे वातावरण सातत्याने निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी केला नव्हता. तो
गांधीजींनी केला.”
धर्मातीत शासन असो
किंवा नसो, लोकां मध्ये आस्था वर भर देऊनही राष्ट्रिय एकतेच वाटोळे उदभवल गेलं
याला नाकारता येत नाही. काही एखाद्या धर्माचा प्रश्नच आणला कशाला? आणि ते आणून
फाळणी टाळणे अश्क्य झाले तर जातियभेद म्हणजे भाषाभेदचा संदर्भ घेऊन कशाला
धर्माच्या आधारे उदभवलेला फाळणीवाद टाळण्याचा प्रयत्न का केला गेला नाही? गांधीना एक तर
धर्माचा नाद आणि दुसरं म्हणजे आपले अनिवासी भारतीयचा नाद सोडायला तैयार झाले नाही ते
एक महा निराशाजनक गोष्ट राहिली आणि त्याचे विरुद्धात, जरी अगदी जिन्नाला भाषाभेदचा संदर्भ अमान्य
नव्हता तर ही गोष्ट आणखीच निराशाजनक झाली हे मान्य केले पाहिजे. त्याअर्थी गांधीचे
जसे हात रक्तानी रंगले तसे जिन्नाचे हात रंगले नव्हते हे लक्षात घेण्याजोग
आहे.
आपल लिहिलेलं - “मुस्लीम हे वेगळे
राष्ट्र असतील तर त्यांचे बहुसंख्या असणारा प्रदेश हिंदुस्थानच्या बाहेर जाणारच,
ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ होती.” जर “भारत अखंड राहीला असता” तर “40 कोटी हिंदूंचे
(भारतीयांचे) जीवन सांस्कृतिकदृष्टया उद्ध्वस्त झाले असते आणि भारताचे भविष्य
राजकीयदृष्टया अंधारलेले असते. हिंदूंचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ देण्यास गांधीजी
तयार नव्हते.”
याचा निकष
सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ निघत की जे झालं ते चांगलं मानलं गेलं आहे. सिंधी,
पंजाबियांना आपलं वडीलोपार्जित घरं, शेती, उद्योग, कारखाने सोडावं लागलं ते एक
चांगल्या उद्देशासाठी. आपल्याला निसर्गांशी काय करायचा? धर्मा व्यतिरिक्त
ओळख कोणाला हवेत असे इथे निकष निघतो. इंग्रजांना गुजरातला जापान सारख्या बळकट बनवायच
होत असे नव्हत. सगळ्याना स्वतःहून अल्पित
अनिवाशी सारख्यां भारतीय बनवायचा प्रयत्नात ते राहिले होते. ते अजून चालू
आहे. आणि बाकी सगळ्याना धार्मिक उन्माद वाढविण्यात
यश मिळवायचा ‘देशाचा हितासाठी’ ते निश्चितच दगडावरचे रेघ होऊन
बसलेली आहे.
फाळणी झाल्याने ते अखंड भारत मधून 25 टक्के कापले गेल. त्यानंतर भारताला जे काय मिळाले ते भारताच्या 60 टक्के इंग्रजांचा ताब्यात
होता ते मिळाले. बाकीचे 40 टकके भारताने
स्वातंत्र्या नंतर मिळवून घेतले आणि आपलं आधिपत्य इंग्रजांपेक्षाही विस्तावलं ते
चोख दिसतं. आपल्या पैकी लालची साम्राज्यवादी कोणीच झाले नसेल असा समजावं, आणखी काय?
हिमांशु ढेबर / दुपारी 2.00 वाजतां, 16-09-2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा