बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

मराठी भाषे विषयी आदर


Sachin Khedekar’s view on Marathi language decline.

"सचिन खेडेकर चा हा विडिओ बघून मराठी भाषा व मराठी माणसाची येणारी परिस्तिथी किती बिकट आहे हे तुम्हाला कळेल.(फक्त मराठी भाषे विषयी आदर असणार्यांनीच विडिओ शेयर करा )"

माझी टिप्पणी:
    कारण काय आहे की पूर्वी आमच्या वर राज करणारे बाहेरचे होते. औवरंगजेब समजा की माऊंटबेटन किंवा चाणक्य. जेव्हा ते राज्य करीत होते तेव्हा काही अल्पगणिक लोक सोडून बाकीच्यांना आपले अस्तित्व गमावण्याची वेळ आली नव्हती. आता ते गेले आहे आणि आपण पूर्ण एक आव्हान समजुन – समजुतदार लोक - त्यांचेच काम करित बसलो आहोत. त्यामुळे त्यांचे अस्तित्व, ओळख, भाषा व्यापक दृष्टीनी  अंगीकारावी  लागत आहे. हे सगळं एका देशा साठी,  भारत देशा साठी. एक हिंदुस्तान, किंवा इंडिया साठी. बाहेरच्या लोकांच्या ऊपदेशाप्रमाणे बनलेल्या एका देशा साठी.

     अत्यंत भाषाप्रेमी बांगला देशाप्रमाणे आम्ही एकले चलो झालो अस्तो तर अप्रांतिय भाषाचे दडपण त्याप्रमाणे फार कमी अवाक्यात आले असते आणि मराठी, बेंगाली भाषा सारखेच आंतरराष्ट्रिय भाषेचा बहुमान मिळाळा असता. 

     आता आजचे दिवस मराठी भाषावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे उगाच वेळ घालवणे असे आहे. हे सगळ सध्याचा राजतंत्र मुळे झाले असुन हे सहज समजण्याजोग आहे. हे सगळे सचीन खेडेकरच्या अवाक्या बाहेरची गोष्ट आहे असे समजावे का? त्यांनी काही उसासा टाकल्या शिवाय, नुस्त गांभिर्य दाखवल्या शिवाय काही करता येत नाही असे समजावे.

    काश्मीरसारखाच हा एक असाध्य प्रश्न आहे. लोक म्हणतात काश्मीरचा प्रश्न आहेतच कुठे. जो आहे तो आतंकवादाचा आहे.  सचीन खेडेकरचा हा उसासा एक सुक्ष्म आतंकवाद समजायचा का?


रात्रीचे 10.30, ता. 02-08-2017 

अधिकसाठी खालील उजव्या बाणावर क्लिक करा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा