रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

देवाची मनाची गोष्ट अगदीच वेगळी

मूळ लेखाकडे जायला -  लोकमत_20230814

भारत गुलाम का बनला?

डॉ. विजय दर्डा (चेयरमैन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

लोकमत वृत्तपत्र, दिनांक १४-०८-२०२३


माझी टिप्पणी: 'भारत गुलामका बनला?' याचा अर्थ भारत आज गुलाम नाही असा होत नही. खर तर 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव  आपण असे म्हणून साजरा करतो की भारत गुलाम तर आहेतच पण फरक इतका आहे की आता त्याची गुलामगीरी स्वनिर्मित आहेस्वावलंबी आहेआत्मनिर्भर आहे,   आणि त्याप्रमाणे देश स्वतंत्र आहे.

लेखकांचे प्रश्न हा आहे की 'भारत गुलामका बनला?' की 'स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना या प्रश्नाचा विचार केला तरच भारताची कळ काढण्याची हिंमत पुन्हा कुणी करणार नाही!'

भविष्यात जे कुणी असू शकते त्यांना हिंमत असो किंवा नसोपूर्व सारखा गुलामगीरी करवून घेण्याचा आनंद नक्कीच मिळणार नाही कारण की आता भारत स्वतःहून इंग्रजांनी शिकवून दिलेली गुलामगीरीऔरंगझेबनी शिकवून दिलेली गुलामगीरी शिस्तिने जे पाळत पाळत पुढे येत राहिलेलो आहेत आणि अशे होऊन त्याची 76 वर्षें सुद्धा ओलांडलेली आहेत.

 खर तर मोहम्मद गझनीतैमूरलंगनादिर शाह किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या जितके कौतुक करता येत इतकी कमी पडते.  परंतु भारतापेक्षा अगदी जगाचा किरकोळ प्रांतावरून आलेले हे लोकांना दाद देण्यात भारत अजिबात तयार नाही याची नोंद करणे गरजेचं  आहे.   एक तर किरकोळ प्रांतातले लोकजस की लेखात लिहिल्याप्रमाणे अटलजींना सांगण्यात आले होते की -  गझनीला कशासाठी जायचेते काही पर्यटनस्थळ नाही. बरे म्हणावे असे हॉटेलही तेथे नाही!  आणि तशच ईस्ट इंडिया कंपनीची मातृभूमीम्हणजे ब्रिटेन बद्दल सांगण्यात यावे तर ती एक बेत आहेइतका छोटा की एक माहाराष्ट्राच्या क्षेत्रफळामध्ये तीन असे बेत समावले जाऊ शकते.  त्यामूळे लोकांचे एखादी सुक्ष्म जागातून येणे,  लांबून प्रवास करून येणे आणि सगळ्यात महत्व म्हणजे भाषांची अडचणी न जुमानता पुढे जाऊन इतकेच नाही की एखादी लढाई जिंकणेपण पुढे जाऊन लोकांना आपली भाषा गिरविणेआपले लोकतंत्रराज्यतंत्र कशे चालवाचे त्यांचे धडे शिकवणे आणि अशे म्हणूनच हिंदुस्तान किंवा इंडिया अस्तित्वात आणून देणेते जे आपण उपभोगतो आहोत ते सारे करून देणें हे काय किरकोळ गोष्ट नव्हतीच की.  

पण आपल्याला त्यांचे कौतुक करणे ते मनात बसणार नाही.  असे म्हणणे रास्त आहे की  गुलाम आपला मालकाची कधिच कौतुक करणार नाही.  अन्यथा गुलाम आणि मालका मध्ये फरकच काय राहणार?  आणि एकदाचे गुलाम कायमचे गुलाम अस समीकरण इथे होत आहे. मालकांनी बांधुन ठेवलेली साखळी तोडता कामा नाही अशी खबरदारी भारत बाळगून बसलेला आहे.  

एक बाजू अशी आहे की भारत एक बाजू आहेआणि बाकीचे जग दूसरी बाजू. भारताला ह्याह्या देव लागू पडतेहा हा खाऊ लागू पडतेअशे अशे पथ्य लागू पडतेअशे अशे सण लागू पडतेकाही एखादी विशेष संस्कृती लागू पडतेइत्यादीइत्यादी. भारत म्हणजे हे आणि हे.    ज्याना नकोय हे सगळे त्यांना देश सोडून जावे अशी विनंती सतत असते.

अशे असूनही प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी वसुधैव कुटुम्बकम ही तात्विक संकल्पना सतत मांडत असताना आढळतात.  कारण की त्यांचे  सतत जगाचा दौरा करणे योजिले असते. वसुधैव कुटुम्बकम मध्ये जगाच सर्व काही समावेशक असते.  इंग्रजजर्मनरूसीचीनीहे सर्वकाही समावेशक असत. कशे खाऊकशी संस्कृती सर्वकाही समावेशक असते. जगाच काहीही देवाज्ञा बाहेर नसतच की अशी समझ!

पण हे तर गोंधळच मचावणारनाही का?  खर तर हे मोदीची 'मन की बातमध्ये  किती बसणार?  ते तर असु द्यागांधीजीला सुद्धा हे नको असेल.  इतक्या पराकाष्टानी हा देश स्थापित केलेला आहे की त्यात हे नकोते नको आणि ज्यामूळे पाकिस्तानाची सुद्धा वाट मोकळी केली.  ज्यामूळे सिंधीपंजाबी आपआपले घरबार सोडून भारतमाता की जय म्हणायला पूढे सरकले.  पण हे तर काय ह्यासाठी की देवाची मनाची गोष्ट (म्हणजे वसुधैव कुटुम्बकम) पुढे सरकावे?  आजिबात नाही.   आम्ही आपआपले मंदीर बांधून देवांला त्यात कोंडून ठेवू. त्यांची काय ताकत की ती आमच्या मनाविरूध घोषवाक्य काढेल

 पण देवाला सगळ्यांचा बघावे लागतेनाही का?  अशे थोडी न आहे की ते भारतीयांशी च  आपले मन जुळवणार आणि बाहेरचे लोकांना बाहेर उन्हात ताटकळत ठेवणार?  भारतामध्ये किती किती पूजा पाठ होत असतंबहुदा फार पूर्वीपासून.  की देवाशी सलगी जोडायला काही दिवस उपवास ठेवायचा.  नॉन वेज (मांसाहार) अजिबात नकोय कारण की ते काही दिवस देव खाली वाकून प्रखर्शानी बघतो.   बाकीचे दिवसात हे खाऊते खाऊ पण गायां नकोच नको. गायांची बाबच वेगळी.  पण हे सगळ केल्यावर सूद्धा देव गायखाऊ अंग्रेजांना पाठवतो !  राज करालया पाठवतो.  म्हणजे की आपआपला मानवलेला देवाच्या पाठिंबा बळकावून सुद्धा भारताला मानकरी मिळाली ते एक इमानेइतबाराने गुलाम व्हायची !

 खर तर भारताला ताबडतोब वैष्विक दर्जा देणे भाग आहे. जस की वसुधैव कुटुम्बकमचा आशय आहे.   एकदाचे भारताची सीमा रेषा मध्ये विष्वची सीमारेषा शामील केली की एक मोठी चिंता च मिटली.  सध्याचे तामिळतेलुगुगुजरातीमराठी .... जोडिला इंग्रजजर्मनरूसीचीनी, ...इत्यादी होणे भाग आहे.  कुठली आमचे संस्कृती आणि कुठली देशाबाहेरची याच विरंगुळाच राहणार नाही.  देशच समजा विष्व झाले तर तुम्हाला सग्ळांशी हातमिळवणी करणे भागच आहे आणि तेच करण्याची आता आवश्यकता आहे. आणि इथे इतर लोकांना शिकायची गरज नाही  जितकं की स्वयं सध्याचा भारताला शिकायची गरज आहे.  सरदार पटेलचा पुतळा ऊभे करून देवाचा विरोध कितीदा करत राहणार हे भारत!

वसुधैव कुटुम्बकम ही तात्विक संकल्पना त्यात इस्ट इंडिया कंपनी समावेशक होती आणि मोहम्मद गजनी सुद्धा. त्यात संबंधित बोंबेआणि औरंगाबादला नाकारणे ती तात्विक संकल्पनाशी जुळत नाही. विक्टोरीया टर्मिनस ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस असे संबोधणे ते दूरगामी गुलामांची जात ही करू शकतेत्याची नोंद घ्यावी!

 हिंदू शात्रात ब्राह्मणांचा उलेख म्हणजे देवांशी जवळीक असणारे लोकांचे उलेख.  तर देवानी कुठले ब्राह्मणांना दाद दिली असे समजले जावेलक्षात घेतणे आवश्यक आहे की भारताचा इतिहासात  त्यांनी इंग्रजांमधले ब्राह्मणांला दाद दिली.  ब्राह्मणांला इंग्रजीत जेंटलमेन असे शब्द लागू होतोय. वसुधैव कुटुम्बकम जिंदाबाद.

11.33 सांय, 30-08-2023 

माझी टिप्पणी - लोकमत समाचार

माझी टिप्पणी - Lokmat Times


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा