शुक्रवार, ४ मार्च, २०२२

काश्मीरः दुहेरीपणापासून सूटणे

Link to click:  Lokmat

ना तो शिकारा सापडला... ना तो भाऊ-भाईजान सापडला!
विजय दर्डा, 21-02-2022

------------------------------------------

माझी टिप्पणी: लेखकाने आपला दृष्टिकोन मांडला आहे की 'जनभावना! -  फार महत्त्वाची असते.'  परंतु काश्मीरबाबतीत हा दृष्टिकोन अमेरिकाचे अध्यक्ष ज्यो बाइडन आणि उपाध्यक्ष कमला हैरीस यांना ही दांभिक वाटेल. या दोघेनी मानवी हक्कांचे प्रश्न नक्कीच उठवले आहे. असा दृष्टिकोन काँग्रेस पार्टीच्या  विचारसरणीचाच भाग होऊ शकतो. भाजपनी काँग्रेसचा दुहेरीपणापासून  भारताला सोडायला लावले आहे असेच म्हणा जणू.

एका बाजूचा लेखक पाकिस्तानच्या विरोधात म्हणतो, 'शेजारच्या  देशाने लावलेल्या आगीमुळे तिथले हे सारे सुख विस्कटून गेले..'  दूसरा बाजू  एक विषण्ण विरोद्धाभास म्हणून, त्यांनी लिहीले आहे 'मी थक्क झालो आणि विषण्णही' – जेव्हां ते काश्मीरमध्ये गुलमर्गची एक हॉटेलमध्ये मुकामात असताना तेव्हां एक भारत-पाक क्रिकेट सामन्यात 'पाकिस्तान हरल्याने इथे लोक उदास बसले आहेत. अनेकांनी तर अन्नही तोंडी लावलेले नाही!'  अशा समीकरण करणारी गोष्ठ, अशी विरोद्धाभास करणारी गोष्ट तर भाजपावाल्याकडून लांबच ठेवले जात असे. उलट, भारतात इतरत्र आढळणारे  काश्मिरी विद्यार्थ्यांकडून पाकिस्तानाशी त्यांची एकनिष्ठताबद्दल देशद्रोहीपणाचा आरोप ठोकण्यात येत आहे,  आता हा आजचा नवीन आत्मविश्वास बाळगणारे भारतामध्ये.  परंतु खर तर आत्मनिष्ठता एक प्रवित्र बंधन आहे.  ती म्हणजे मध्यरस्त्यात बदल्यानेच देशद्रोहीचा ठपका लागू शकतो असे समझणे रास्त होईल.

अशी समीकरण करताना कलम 370 हटवण्याबद्दल बोलून लेखकाने आपली संमती दर्शवत म्हटले आहे की, मी त्यांना समजावत होतो, एक देश, एक झेंडा आणि एक कायद्याची इथे आवश्यकता होतीच. आता घुसखोरांना आळा बसेल. आपले जनजीवन बदलेल. काश्मीर पुन्हा स्वर्ग होईल.पण इथे उत्तर म्हणून आहे – पण ते तळतळून म्हणत होते, लेकिन इसके लिए धारा 370 हटाने की क्या जरूरत थी?

मग लेखात वरील वाक्य येते की ही जनभावना! -  ती फार महत्त्वाची असते '.

महत्त्वाची जनभावना?  अगदीच महत्त्वाची! त्यांनी आणखीन लिहिलेलं आहे 'श्रीनगर विमानतळावर तीन स्तरात सुरक्षा व्यवस्था आहे. सीआयएसएफ आणि सीआरपीएफ यांच्याकडून चूक संभवतच नाही.' दल सरोवरचा 'किनाऱ्याला प्रत्येक 100 मीटरवर पोलीस पहारा होता. सगळीकडे शस्त्रधारी सीआरपीएफचे जवान दिसत होते.'  -  हे सगळे  केवळ या महत्त्वाच्या जनभावनामुळेच नाही का?

या भारताला मिळालेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक म्हणजे भाजप,   ज्यांने काहीही न डगमगता 370 हटवून जनभावनाला न उसळून आण्याची आपली बांधिलकी दाखवली आहे. लोकांना नजरकैदेत ठेवून, इंटरनेट सेवा थांबवून.  त्यात जग जे काय पाहते ते पाहू द्या, कमला हैरीसला त्यात जे काय समीकरण मांडता येईल ते मांडू द्या!

लेखक म्हणतो, ‘काश्मीरला स्वर्ग बनवायचे असेल तर स्वीत्झर्लंडप्रमाणे या प्रांताला सांभाळावे, पुन्हा सजवावे लागेल. तरुणांना काम द्यावे लागेल. शिकारे सजवावे लागतील'  आणि या मुद्द्यासोबत  अगदी न विसरता  'लाल चौकात निर्भयपणे जाऊन तिरंग्याला सलाम करून येता येऊ शकेल, असे वातावरण तयार करावे लागेल..'

यामध्ये दोन गोष्टी प्रकर्शाने जाणवते. एक म्हणजे इतरांच्या बाजूने पाहण्याची शक्तीच्या कमी पणा. गांधीजींना महात्मा कसे म्हण्यात आलं?  यावर आजकाल प्रश्न उपस्थित केला जात आहे!  एक कारण स्पष्ट आहे. त्यांना समोरांच्यांच्या नजरेतून सूद्धा त्यांना बघणं आवडत होतं. कदाचित त्यांनी त्याच कारणानी तीन गोळ्या खाल्ल्या, ज्या आजच्या भारतात सुद्धा त्यांना मिळाल्या असत्या. सर्वसामान्य भारतीयांमध्ये पलीकडून बघण्याची ही बाब नसते.  भारतात समोरची टीमकडून खेळाच्या मैदानात भारताविरुद्ध चांगला काही झालं तर स्टेडियम सुन्नच झाल्याच साधारणपणे नोंद होतं. इंग्रजांकडून भारताला लोकशाही मिळाली. पण भारतीय स्वतः लोकशाही आहे की नाही हा एक वेगळा मुद्दा आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे भारतात गायीला पूजेचे स्थान देणे. गायीला काय लागते? फक्त चारा नाही का? चारा न सापडल्यास मानव जाती प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अन्न लपवितात हे तिला चांगलेच माहीत असते.   खर तर,  गायीची पूजा केल्याने आपणही तिच्या तत्त्वांनी प्रेरित होतो आणि त्याच प्रमाणे 'तरुणांना काम द्यावे लागेल'   आणि ते दिल्यावर काश्मीर प्रकरण आपसूकच सुटते असं समझून घेतो. कदाचित आपण इतके कसं यशस्वी होऊ शकतो याची जाणीव अग्रजांला झाली असावी. चारा फेकल्याने प्रकरण संपते. सामान्य भारतीय फक्त आनंद शोधण्यात मग्न असते.  चारा सापडला, गाय सुखी, देश सुखी. येथे भौतिकवाद आणि अध्यात्मवादाचा मुद्दा येतो. आम्ही विचारू शकतो, काश्मिरी लोकांना गाय व्हाला काय अडचणी आहे?  कदाचित जर ते हिंदू असते, आणि गायींची पूजा करत असते तर...

5.20 p.m. 03-03-2022  


------------------------------------------

पूर्ण ब्लॉग वाचाः  -  मराठी अमूल्य जग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा